Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२३: यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे योग

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: इतरांचा विचार करावा. वाद व मतभेद टाळावे. वाणीवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.
वृषभ: आर्थिक लाभ संभवतो. मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकारासाठी पैसा खर्च होईल. आनंदात वेळ घालवू शकाल.
मिथुन: काही अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. कुटुंबियांशी मतभेद होतील.
कर्क: आजचा दिवस लाभदायी. नोकरी व व्यापारात लाभ होतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ. अचानक धनप्राप्ती.
सिंह: आत्मविश्वास व मनोबल कामात यश देईल. बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती योग. सरकारी कामात यश.
कन्या: आजचा दिवस आनंदाचा. आर्थिक फायदा होईल. आनंददायी बातमी समजेल. भावंडांकडून फायदा होण्याची शक्यता.
तूळ: नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी. गूढ विद्येचे आकर्षण वाढेल.
वृश्चिक: आजचा दिवस आनंद व उल्हासाचा. स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. व्यापारात फायदा. मान-सन्मान वाढ.
धनु: आजचा दिवस शुभफलदायी. यश, कीर्ती, आनंद प्राप्ती होईल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल.
मकर: मानसिक चिंता. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ नाराज होतील. द्विधा मनःस्थितीने निर्णय घेण्यात अडचणी येतील.
कुंभ: स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल.
मीन: सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार, खंबीर मनाने कार्य चांगल्या प्रकारे करु शकाल. मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.
क्लिक करा