Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: ४ राशींना अनुकूल, कौतुक होईल; हातून सत्कार्य घडेल

तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
मेष: कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ: द्विधा मनःस्थितीमुळे असमाधानी राहाल. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन: मित्रांकडून लाभ होईल. धनलाभ होईल. सरकारी कामातून फायदा होईल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.
कर्क: कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. कामाचा व्याप वाढेल. मित्र भेटीने आनंदित व्हाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.
सिंह: अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.
कन्या: इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.
तूळ: आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल.
वृश्चिक: दिवस आनंद साजरा करायचा आहे. व्यापार-व्यवसायात व्यस्त राहाल. लाभ होतील. कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घ्याल.
धनु: कष्टाच्या प्रमाणात यश प्राप्ती नाही. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी तरतूद कराल. एखादे सत्कार्य घडेल.
मकर: अती भावनाशील व्हाल. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. शक्यतो प्रवास टाळावेत.
कुंभ: कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील.
मीन: स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल.
क्लिक करा