Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, नोकरीत बढतीचे योग; प्रसन्नतेचा दिवस

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...
मेष: गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
वृषभ: वैवाहिक जवळीक साधता येईल. शरीर व मनाला प्रसन्नता वाटेल. यश व कीर्ती मिळेल. अचानक धनलाभ होईल.
मिथुन: कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. धनप्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
कर्क: आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. नवीन कार्यारंभ न करणे हितावह राहील.
सिंह: कुटुंबीयांशी मतभेद होतील. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.
कन्या: आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळेल.
तूळ: रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.
वृश्चिक: दिवस शुभ फलदायी. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ संभवतात.
धनु: रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल.
मकर: दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक. मित्रांची भेट होईल. व्यापारात व नोकरीत प्राप्ती वाढेल. नव्या वस्तूंची खरेदी होईल.
कुंभ: प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश मिळेल. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. बढती व धनप्राप्ती संभवते.
मीन: शरीरास आळस व थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद होतील.
क्लिक करा