Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२४: यश-कीर्ती लाभेल, धनप्राप्तीचे योग
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. बोलण्यावर संयम ठेवा.
वृषभ: आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. मनाला प्रसन्नता वाटेल. यश व कीर्ती मिळेल. अचानक धनलाभ होईल.
मिथुन: दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल. कामात यश व कीर्ती लाभेल. धनप्राप्ती होईल. नोकरीत लाभ होतील.
कर्क: आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. अचानक पैसा खर्च होईल. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.
सिंह: मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जपून राहा.
कन्या: आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील.
तूळ: मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल.
वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भेटवस्तू मिळतील. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात.
धनु: आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल.
मकर: आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल.
कुंभ: प्रत्येक काम सरळपणे होऊन यश मिळेल. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. बढती व धनप्राप्ती संभवते. मान-प्रतिष्ठा वाढेल.
मीन: शरीरास आळस व थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही.
क्लिक करा