Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२४: मतभेद संभवतात, खर्चात वाढीचा दिवस

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. मान-सन्मान होतील.
वृषभ: दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी. कौटुंबिक वातावरण आनंदी. प्रतिस्पर्ध्यांवर मात शक्य. मतभेद संभवतात.
मिथुन: दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता. आर्थिक लाभ. कामात यशस्वी व्हाल.
कर्क: आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. मनात विचारांचे वादळ उठेल. नव्या कामात अडथळे येतील.
सिंह: आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी. फायदेशीर गुंतवणूक शक्य.
कन्या: आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही.
तूळ: आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. जास्त खर्च होईल. मतभेद होतील. अडचणी येतील.
वृश्चिक: मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आत्मविश्वास वाढेल.
धनु: आजचा दिवस लाभदायी. प्राप्तीत वाढ संभवते. मन प्रसन्न होईल. मान-सन्मान होईल. व्यापारात लाभ संभवतो.
मकर: स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम दिवस. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. बढती संभवते.
कुंभ: दिवस प्रतिकूलतेचा. वाणीवर संयम ठेवावा. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते.
मीन: वाद होण्याची शक्यता असल्याने वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे. गूढ विद्येचे आकर्षण होईल. गहन चिंतन मनाला शांती देईल.
क्लिक करा