Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २६ ऑक्टोबर २०२४: महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात.
वृषभ: भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता. कामे पूर्ण झाल्याने आनंद वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ संभवतात.
मिथुन: मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.
कर्क: भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. मन ताजेतवाने राहील. पैसा जास्त खर्च होईल.
सिंह: कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. मन प्रसन्न होईल.
कन्या: आजचा दिवस मध्यम फलदायी. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल.
तूळ: कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. गृहसजावटीत बदल कराल. आर्थिक लाभ होतील. मानसिक शांतता लाभेल.
वृश्चिक: नशिबाची साथ लाभेल. चांगल्या बातम्या येतील. धनलाभ संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. मान-सन्मान होतील.
धनु: नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल.
मकर: कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
कुंभ: दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. वाहनसौख्य मिळेल.
मीन: वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
क्लिक करा