Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य: सुखद प्रसंग घडतील, हातून परोपकार घडेल, आनंदी दिवस
तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या...
मेष: दिवस मिश्र फलदायी. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. संताप वाढल्याने कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा.
वृषभ: दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल.
मिथुन: दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. भोजनात मिष्टान्न मिळेल.
कर्क: दिवस अनुकूलतेचा आहे. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीत लाभ होतील.
सिंह: दिवस आनंददायी. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. हातून एखादा परोपकार घडेल.
कन्या: दिवस प्रतिकूलतेचा आहे. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. वायफळ खर्च होतील.
तूळ: दिवस शुभ फलदायी. भावंडांशी संबंध चांगले राहतील. धनलाभ होईल. चांगल्या बातम्या मिळतील. नशिबाचा साथ लाभेल.
वृश्चिक: दिवस साधारणच. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. विद्यार्थ्यांना अध्ययनात अडथळे येण्याची शक्यता.
धनु: विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आर्थिक लाभ होईल.
मकर: विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल.
कुंभ: दिवस मंगल कार्य व नवीन कार्य आयोजनासाठी अनुकूल. नोकरी-व्यवसायात बहुविध लाभप्राप्ती होईल. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल.
मीन: प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील. सरकारकडून लाभ मिळतील.
क्लिक करा