Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: ‘या’ राशींना शुभ दिवस, धनलाभाचे योग; यश-प्रगती संधी

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश.
वृषभ:वाणी-वर्तनावर संयम ठेवावा. जमीन-संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता. सही करताना काळजी घ्या.
मिथुन: सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल.
कर्क: द्विधा मनःस्थितीमुळे दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती.
सिंह: आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा.
कन्या: भावनेच्या भरात हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपारनंतर आत्मविश्वास वाढेल. मान-प्रतिष्ठेत वाढ.
तूळ: मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
वृश्चिक: सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. पदोन्नतीची शक्यता. मित्रांकडून फायदा.
धनु: एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामे सहजपणे होतील. पदोन्नती संभवते.
मकर: मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानक खर्चात वाढ होईल. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल.
कुंभ: लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद. नवीन कामाची सुरुवात शक्य. स्फूर्ती, प्रसन्नतेचा अभाव जाणवेल.
मीन: दिवस प्रतिकूलतेचा. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन पूर्ण होण्यास विलंब. व्यापारात भागीदारांशी मतभेद.
क्लिक करा