Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य,२५ डिसेंबर: २०२४चा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल?
तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
मेष: मानसिक समाधानाचा दिवस. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. यश व लाभ मिळेल.
वृषभ: कामात आघाडीवर राहाल. योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. सुखद बातमी मिळण्याची शक्यता.
मिथुन: वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. नवीन कार्यारंभ शक्यतो टाळा.
कर्क: सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामाजिक मानहानी संभवते.
सिंह: शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या संधी चालून येतील. आर्थिक लाभ होईल.
कन्या: आज मानसिकता द्विधा राहील. नाहक खर्च करावा लागेल. आयात - निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.
तूळ: सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल.
वृश्चिक: आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो.
धनु: प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया दिवस लाभदायक.
मकर: व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्रांकडून लाभ होतील.
कुंभ: कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही.
मीन: प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. संयमाने वागावे लागेल. अचानक धनलाभ होऊ शकेल. जुनी येणी वसूल होतील.
क्लिक करा