Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाची शक्यता, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या...
मेष: सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखादी अलौकिक अनुभूती होईल. अचानक धनलाभ होईल.
वृषभ: दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. विदेशातील मित्रांकडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल.
मिथुन: दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्तीस अनुकूल. आर्थिक लाभाची शक्यता. कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
कर्क: दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही.
सिंह: नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील.
कन्या: अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आर्थिक लाभ होतील.
तूळ: हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये.
वृश्चिक: तन-मनाने खुश व ताजेतवाने राहाल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. आनंददायक बातम्या मिळतील.
धनु: दिवस कष्टदायक आहे. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. रागावर जरा अंकुश ठेवा. पैशाची चणचण भासेल.
मकर: दिवस नोकरी-व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. लाभ होईल.
कुंभ: प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने खुश व्हाल. नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यात यश. धनप्राप्ती तसेच बढती संभवते.
मीन: नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.
क्लिक करा