Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२५: मान-सन्मान; सौख्यदायी, लाभदायी दिवस

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...
मेष: आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ: सावध राहावे. नवीन कार्यात अडचणी येतील. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी उद्भवतील.
मिथुन: दिवस सौख्यदायी. दिवसभर दैनंदिन कामेच करत राहाल. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क: व्यावसायिक वातावरण अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
सिंह: रागावर नियंत्रण ठेवा. घरात आनंद-उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो.
कन्या: शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी संभवते.
तूळ: नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल दिवस. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद. भाग्योदय होईल. समाजात मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक: नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. गूढ विषयांचे आकर्षण होईल.
धनु: आजचा दिवस शुभ फलदायी. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. वायफळ खर्च होतील.
मकर: आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. मन प्रसन्न होईल. हातून परोपकार किंवा सत्कार्य घडेल.
कुंभ: आजचा दिवस लाभदायी. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. पैसा जास्त खर्च होईल.
मीन: नोकरीत वरिष्ठांकडून लाभ. पदोन्नती संभवते. व्यापारविषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल.
क्लिक करा