Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२४: यश-प्रसिद्धी-प्रतिष्ठा; समाधानी दिवस
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ: वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. समृद्धी वाढेल. मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल.
मिथुन:विविध विचार तरंग उमटतील. बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा.
कर्क: आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील.
सिंह: दिवस सुखा-समाधानात जाईल. भावंडांबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. चिंतामुक्त व्हाल. कार्यात यश.
कन्या: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील.
तूळ: आर्थिक नियोजन यशस्वीपणे कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे.
धनु: आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्राप्तीत वाढ संभवते.
मकर: लाभदायी दिवस. जुनी येणी, अर्थ प्राप्तीसाठी दिवस अनुकूल. सरकार, मित्रांकडून लाभ होईल. प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.
मीन: आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. दिवस आनंदात जाईल. यश व प्रसिद्धी वाढेल.
क्लिक करा