Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य : नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल.
वृषभ : आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन : सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनाचे सौख्य उपभोगू शकाल
कर्क : महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.
सिंह : संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल.
कन्या : कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी.
तूळ : नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
वृश्चिक : वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख - शांति नांदू शकेल. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल.
धनु : नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. स्वकीयांना भेटून आनंद होईल.
मकर : सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता राहील.
कुंभ : आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीशी सलोख्याचे संबंध राहतील.
मीन: व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱयां कडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
क्लिक करा