Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२४: मान-सन्मान, पदोन्नती शक्य; शुभ दिवस!

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...
मेष: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी. धनलाभाचे योग. व्यापार विस्ताराची योजना तयार कराल.
वृषभ: कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या.
मिथुन: आज मनाची स्थिती दोलायमान राहील. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. तणाव संभवतात.
कर्क: दिवस शुभ फलदायी. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता. मनात प्रसन्नता राहील. आर्थिक लाभ होतील.
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. कार्यात यश मिळवू शकाल.
कन्या: दिवस मध्यम फलदायी. विचार समृद्ध होतील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल.
तूळ: प्रकृतीची काळजी घ्यावी. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. अचानकपणे खर्चात वाढ होईल. मतभेद होतील.
वृश्चिक: दिवस लाभदायी. नोकरी - व्यवसायात फायदा. मित्रांचा सहवास घडेल. लाभ होईल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
धनु: दिवस शुभ फलदायी. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. कामात यश मिळेल. पदोन्नती संभवते. मान-सन्मान होतील.
मकर: दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल.
कुंभ: अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील.
मीन: व्यापाऱ्यांना उज्ज्वल भविष्य. भागीदारीस अनुकूल दिवस. साहित्यिक, कलाकार, कारागीर कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल.
क्लिक करा