Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : रागावर ताबा ठेवावा लागेल; नवीन काम सुरू करू नका

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष: आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही.
वृषभ: आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल.
मिथुन: वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. प्रणयक्रीडेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. . भोजनात मिष्टान्न मिळेल. प्रकृती उत्तम राहील.
कर्क : घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील.
सिंह: आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीने प्रगतीची बातमी मिळेल
कन्या: स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील.
तूळ: एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. व्यावहारीक कारणांनी प्रवास घडेल
वृश्चिक: कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील.
धनु: आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल.
मकर: विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल.
कुंभ: पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवन व दांपत्य जीवन ह्यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल.
मीन: नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल
क्लिक करा