Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ, नशिबाची साथ

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. हट्टीपणा सोडून द्यावा. कामात यश लाभेल. मतभेद होण्याची शक्यता आहे.
वृषभ: पैतृक संपत्तीपासून लाभ संभवतात. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम. खर्च करावा लागेल.
मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत.
कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी. आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल.
कन्या: कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. कामात व्यत्यय येईल.
तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी. विविध स्तरांवर लाभ संभवतात. सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल.
वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. धनलाभ संभवतो.
धनु: आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील.
मकर: आज नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. अचानकपणे खर्च उद्भवतील. भागीदारीत मतभेद संभवतात.
कुंभ: आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. मन प्रसन्न राहील. मान-सन्मानात वाढ होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल.
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चांगली बातमी मिळेल.
क्लिक करा