Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, २१ मार्च २०२५: अचानक धनलाभ, यश-कीर्ती; आनंदी दिवस
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: एक वेगळाच अनुभव येईल. गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. नवीन कार्यारंभ नको.
वृषभ: कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे जाणवेल. सुखद बातमीने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन: कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल. आर्थिक लाभाची शक्यता. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल.
कर्क: आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र, संतती विषयक काळजी राहील. वादग्रस्त विषय टाळावे.
सिंह: नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका.
कन्या: अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. आर्थिक लाभ होतील.
तूळ: आज द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. आर्थिक लाभाची शक्यता.
वृश्चिक: तन-मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल.
धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील.
मकर: नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे. मंगल कार्यात हजेरी लावाल. लाभ होईल.
कुंभ: प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. धनप्राप्ती, बढती संभवते.
मीन: नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल.
क्लिक करा