Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: नोकरीत पदोन्नती शक्य, धनलाभासह यशकीर्तीचा दिवस

तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या...
मेष: व्यावसायिकांसाठी लाभदायी दिवस. कुटुंबातील आनंदी वातावरण मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील.
वृषभ: वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. केलेल्या कामाची प्रशंसा झाल्याने आनंद होईल.
मिथुन: आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. अचानक धन खर्च होईल.
कर्क: हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्या. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
सिंह: बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
कन्या: वाणीच्या प्रभावाने मोठे लाभ होतील. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. आर्थिक लाभ होईल.
तूळ: रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. आर्थिक लाभ संभवतात.
वृश्चिक: विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह वेळ आनंदात जाईल.
धनु: कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.
मकर: परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशप्राप्ती संभवते. नोकरीत पदोन्नती संभवते. धनलाभ व सामाजिक मान-सन्मान होतील.
कुंभ: नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल.
मीन: व्यापारी भागीदारीत लाभ होईल. नवीन कार्यात अडचणी निर्माण होतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी भांडण होण्याची शक्यता आहे.
क्लिक करा