Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: आवडीचे भोजन, समस्येतून दिलासा; लाभाचा अनुकूल दिवस

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: मन अधिक संवेदनशील बनेल. कार्यालय, अन्य ठिकाणी नुकसान होऊ शकते. दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी.
वृषभ: स्फूर्ती, उत्साह अनुभवाल. काल्पनिक जगात वावराल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. आवडीचे भोजन मिळेल. नशिबाची साथ लाभेल.
मिथुन: आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क: शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. दिवस आनंदात व उल्हासात जाईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
सिंह: उग्र स्वभावाने किंवा वाद-विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. वाणी व व्यवहार ह्यात संयम व विवेक राखावा.
कन्या: आजचा दिवस विविध लाभ मिळवून देईल. वरिष्ठ खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. मित्र लाभदायक होतील.
तूळ: कामे सहजतेने पूर्ण होतील. मान-सन्मानात वाढ होईल. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक: कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. संततीची चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे हताश बनवेल.
धनु: रागावर नियंत्रण ठेवावे. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर: उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान-सन्मान वृद्धी होईल.
कुंभ: कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल.
मीन: कल्पनाशक्ती खुलून उठेल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. स्वभावात हळवेवणा राहील. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल.
क्लिक करा