Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: धनप्राप्तीचे शुभ योग, कामात यश; लाभदायक दिवस

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद-विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल.
वृषभ: काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. धनसंचय होऊ शकेल.
मिथुन: आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क: मानसिक चिंता वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात.
सिंह: रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल.
कन्या: सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल.
तूळ: नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते.
वृश्चिक: संततीशी मतभेद संभवतात. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील.
धनु: संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. बेचैनी वाढेल. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील.
मकर: वाहनसौख्य व मान-सन्मान संभवतात. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणाने संताप वाढेल.
कुंभ: दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल.
मीन: दिवस आनंददायी आहे. एखादा आर्थिक लाभ संभवतो. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.
क्लिक करा