Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३: यशप्राप्ती, लाभच लाभ; आनंदाचा दिवस

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. पदोन्नती संभवते. काही नियोजित आर्थिक लाभ होतील.
वृषभ: हळवे व्हाल. नवे कार्य सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.
मिथुन: आनंददायी दिवस. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील.
कर्क: खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यावसायिकांना दिवस लाभदायी. नोकरीत बढतीची शक्यता.
सिंह: साहित्य व कला यातील गोडी वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.
कन्या: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. रागावर संयम ठेवा.
तूळ: नवीन काम आरंभ करण्यास अनुकूल दिवस. गूढ विद्यांचे आकर्षण वाटेल. दुपारनंतर कुटुंबात कलह, मानहानी संभवते.
वृश्चिक: कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल.
धनु: शुभ फलदायी दिवस. धनप्राप्ती होईल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील.
मकर: संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल.
कुंभ: सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरु शकल्याने आनंदात भर पडेल.
मीन: सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस. हातून परोपकार घडेल. सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी शक्य. उत्पन्नात वाढ होईल.
क्लिक करा