Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२४: धनलाभ, व्यापाऱ्यांना यश, शुभ दिवस
तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या...
मेष: शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील.
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान-मरातब वाढेल.
कर्क: आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल.
सिंह: आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल.
तूळ: आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल.
वृश्चिक: घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. कार्यालयात सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणी भेटतील. धनलाभ होईल.
धनु: आज शक्यतो प्रवास टाळावा. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर: आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल.
कुंभ: मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल.
मीन: आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल.
क्लिक करा