Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२३: सूर्याचा धनु प्रवेश; काय उपाय कराल?

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: धनु संक्रांतिपासूनचा काळ चांगला आहे. सन्मान वाढेल. आपली अनेक कामे होतील. विद्यार्थी यशस्वी होतील. प्राप्तीत वाढ होईल. उपाय:-सूर्यास अर्घ्य द्यावे.
वृषभ: मन प्रसन्न होईल. शुभ बातम्या समजतील. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. गुंतवणुकीशी संबंधित कामांना स्थगिती द्यावी. उपाय:-रोज गायत्री चालिसाचे पठन करा.
मिथुन: सूर्य धनु राशीतून भ्रमण करेल. अहंकार वाढू शकतो. जोडीदाराशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. कामाचा व्याप वाढेल. उपाय:-एक माळ गायत्री मंत्राचा जप करा.
कर्क: पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. अनेक क्षेत्रात फायदा होईल. सरकारी कामात एखादे नवीन काम मिळू शकते. उपाय:-सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे.
सिंह: दैनिक कामात अडथळे येतील. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण मध्यम फलदायी आहे. सामाजिक क्षेत्रात सावध राहून कामे करावी लागतील. उपाय:-रोज सूर्याच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा.
कन्या: मन विचलीत होईल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते. धनु संक्रांतिपासून काहीसे सावध राहावे लागेल. भरपूर काम असू शकते. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे.
तूळ: मानसिक थकवा जाणवेल. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण चांगलेच आहे. अनेक त्रास दूर होतील. प्राप्तीत वाढ होईल. उपाय:-सुर्याष्टकाचे पठन करावे.
वृश्चिक: दिवसभर आनंदित राहू शकाल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. धनु संक्रांतिपासूनचा काळ सामान्याहून चांगला आहे. उपाय:-गायत्री चालिसाचे पठन करावे.
धनु: दिवस मिश्र फलदायी. सूर्य आपल्या राशीतून भ्रमण करेल. नशिबाची साथ मिळेल. आपण उत्साहित व्हाल. उपाय:-दिवसाची सुरवात सूर्यास नमन करून करावी.
मकर: प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण खर्चात वाढ करू शकेल. विरोधकांवर मात करू शकाल. उपाय:-शंकरास जलाभिषेक करावा.
कुंभ: खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. धनु संक्रांति काळ खूपच अनुकूल. सरकारी कामे पूर्ण झाल्याने प्रसन्न व्हाल. व्यापारात लाभ. उपाय:-सूर्यास अर्घ्य द्यावे.
मीन: मित्रांकडून लाभ. चांगली बातमी मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. धनु संक्रांति काळ अत्यंत चांगला आहे. उपाय:-गरिबास गव्हाचे व गुळाचे वाटप करावे.
क्लिक करा