Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२४: कसा असेल तुमचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धी मिळेल. व्यापारात लाभ होईल. पैसा खर्च होईल.
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी. कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ संभवतात.
मिथुन: प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता. अधिक पैसा खर्च होईल. वरिष्ठ कामगिरीवर खुश होतील. धनप्राप्ती संभवते.
कर्क: अवैध व निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. परदेशातून चांगली बातमी येईल.
सिंह: प्रसन्न व आनंदित राहाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे.
कन्या: स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल.
तूळ: बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. यश व कीर्ती प्राप्त होईल.
वृश्चिक: आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. नवीन कार्य हाती घेणे हितावह राहणार नाही.
धनु: शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल.
मकर: वाद होण्याची शक्यता. कुटुंबीयांशी मतभेदाची शक्यता. नशिबाची साथ. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मनाला आनंद वाटेल.
कुंभ: मन आनंदी राहील. कृती संयमित ठेवाव्या. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.
मीन: आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील.
क्लिक करा