Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य: अनेकविध लाभ, सुख-समाधान; मान-सन्मानाचा दिवस
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: नव्या मित्रांची भर पडेल. लाभ होईल. सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल.
वृषभ: नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल.
मिथुन: कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी-व्यवसायात सहकार्य न मिळाल्याने निराश व्हाल.
कर्क: नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता.
सिंह: आजचा दिवस मनोरंजन व हिंडण्या-फिरण्यात घालवाल. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल.
कन्या: कुटुंबात आनंद, उत्साहाचे वातावरण राहिल्याने मन प्रसन्न राहील. कामात यश मिळेल. चांगल्या बातम्या समजतील.
तूळ: कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. चांगल्या बातम्या मिळतील. प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक: आजचा दिवस शांतपणे घालवाल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. काही नुकसान होण्याची शक्यता.
धनु: नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्र व नातेवाईकांचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल.
मकर: 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.
कुंभ: कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तू व धनप्राप्ती होईल.
मीन: कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा. पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील.
क्लिक करा