Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: विनायक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ. संततीकडून फायदा. सरकारी कामात यशस्वी व्हाल.
वृषभ: दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. पदोन्नती मिळू शकेल. सरकारी लाभ मिळू शकतील.
मिथुन: आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. खर्चात वाढ होईल.
कर्क: दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. सरकारी कामात विघ्ने येतील. मानसिक अस्वास्थ्य राहील.
सिंह: दिवस मध्यम फलदायी. नोकरी-व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता. सामाजिक जीवनात यश मिळेल.
कन्या: दिवस शुभ फलदायी. मन प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल.
तूळ: दिवस अत्यंत सुखात जाईल. कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग करू शकाल. प्रगती होईल.
वृश्चिक: दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो शांत राहावे. मन चिंतीत राहील. मतभेद होतील. यशहानी किंवा धनहानी शक्य.
धनु: एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. कामात यश. नशिबाची साथ.
मकर: शेअर मार्केट किंवा लॉटरीत गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी दिवस अनुकूल.
कुंभ: दिवस लाभदायी. सहलीला जाऊ शकाल. एखाद्या विषयात प्रगती करू शकाल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
मीन: मन अशांत राहिल्यामुळे एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. मतभेद संभवतात.
क्लिक करा