Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १३ नोव्हेंबर २०२३: तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. जीवनात सुख-समाधान मिळेल. सहजीवनात लाभ होईल.
वृषभ: कोणाची चेष्टा-गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
मिथुन: सर्वत्र लाभच लाभ. कौटुंबिक सुख-शांती राहील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील.
कर्क: शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते.
सिंह: शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. संगीतात विशेष रूची राहील.
कन्या: कौटुंबिक सुख-शांती व आनंदामुळे दिवस आनंदाचा. आवडीचे भोजन मिळेल. आयात-निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल.
तूळ: रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. कामे सफल बनतील. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक: पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजनासाठी खर्च होईल. मनाला चिंता लागून राहील. गैरसमज किंवा मतभेद होतील.
धनु: आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. मिळकतीत वाढ, व्यापारात लाभ.
मकर: व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढ होईल. व्यापारासाठी फायदा संभवतो. पदोन्नती संभवते.
कुंभ: काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. परदेशातून चांगली बातमी मिळेल.
मीन: क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक बेचैनी जाणवेल.
क्लिक करा