Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १३ मार्च २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढ

तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी. हट्टीपणा सोडून द्यावा. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल.
वृषभ: पैतृक संपत्तीपासून लाभ संभवतात. वडील खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी दिवस उत्तम.
मिथुन: आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रमाचा यथोचित मोबदला. नशीबाची साथ.
कर्क: आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार मनात ग्लानी निर्माण करतील. कुटुंबियांशी मतभेद होतील. धन खर्च होईल.
सिंह: कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढ.
कन्या: आपल्या अहंपणामुळे भांडण होण्याची शक्यता आहे. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे.
तूळ: दिवस शुभफलदायी व लाभदायी. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल.
वृश्चिक: कौटुंबिक जीवनाची सार्थकता लक्षात येईल. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. उत्पन्न वाढेल. मान-प्रतिष्ठा वाढेल.
धनु: प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतेत राहील. नोकरी - व्यवसायात त्रास होईल.
मकर: नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. खर्च करावा लागेल. व्यवस्थापन कार्यात नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ.
कुंभ: दिवस प्रसन्नतेचा. आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
मीन: मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास काम यशस्वी करील. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
क्लिक करा