Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष : आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील.
वृषभ : व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील.
मिथुन : बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
कर्क : व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल.
सिंह: उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील.
कन्या : पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल.
तूळ : मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
वृश्चिक : यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील.
धनु : नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही.
मकर : एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील.
मीन : मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल.
क्लिक करा