Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२३: लक्ष्मीपूजन खास; दिवाळी शानदार

दीपोत्सवाचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
मेष: आर्थिक लाभ होतील. वाहन सुख मिळेल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. व्यापार्‍यांसाठी लाभदायी.
वृषभ: चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन: नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. पैसा खर्च होईल. उत्साहात कमतरता जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला.
कर्क: मन खिन्न होईल. काही कारणांनी त्रास होईल. स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल.
सिंह: कामात यश. मनात प्रसन्नता दरवळेल. आर्थिक लाभ. नशिबाची साथ. नवे कार्य हाती घेण्यास दिवस अनुकूल.
कन्या: शुभ फलदायी दिवस. घरगुती वातावरण चांगले राहील. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. मित्रांची भेट होईल.
तूळ: प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. रचनात्मक कार्यात मन रमेल.
वृश्चिक: तामसवृत्ती व बोलणे यावर संयम ठेवावा. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता. आनंदासाठी खर्च कराल.
धनु: आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. व्यापारात लाभदायी दिवस. कुटुंबात सुख - शांती नांदेल.
मकर: आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यवसायात धन व मान - प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ: प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत चुका होतील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल.
मीन: अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा.
क्लिक करा