Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १२ मार्च २०२५: येणी वसूल होतील, आर्थिक लाभाची संधी

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: तापट स्वभावावर नियंत्रण ठेवणे हितावह. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. सरकारी कामात मात्र यश मिळेल.
वृषभ: कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण कराल. लाभ होईल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल.
मिथुन: उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. नवीन कामे सुरू करू शकाल. काही लाभ होण्याची शक्यता.
कर्क: मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. धनखर्च वाढेल.
सिंह: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. मान-प्रतिष्ठा-लाभ. सरकारी कामे जलद गतीने होतील.
कन्या: शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. अचानक धनखर्च होईल. नोकर वर्गाकडून त्रास संभवतो.
तूळ: कौटुंबिक जीवनात सुख व आनंद. उत्पन्न वाढ संभवते. व्यवसायात अनुकूल वातावरण. बढती मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. येणी वसूल होतील.
धनु: कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वेळ काळजीत जाईल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल.
मकर: नकारात्मक विचारांपासून दूर राहा. अचानक खर्च वाढेल. व्यापारात भागीदारांशी मतभेद. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा.
कुंभ: प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. भागीदारांशी चांगले संबंध राहतील.
मीन: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. लाभ होईल.
क्लिक करा