Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १२ ऑगस्ट २०२४: अचानक धनलाभ, व्यापारात यश; सुखाचा दिवस
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. आर्थिक लाभ, प्रवास संभवतात. कामाचे कौतुक होईल.
वृषभ: दिवस शुभ फलदायी आहे. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजित कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात.
मिथुन: शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण अडचणी येतील. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस.
कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. पैसा खर्च होईल.
सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. फायदा होईल. मित्र भेटतील. कलाक्षेत्रात रुची राहील.
कन्या: दिवस शुभ फलदायी. गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. व्यापारात यश प्राप्ती.
तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. विधायक कार्य हातून घडेल.
वृश्चिक: आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल.
धनु: आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल.
मकर: आजचा दिवस संघर्षाचा आहे. व्यापारात कार्यमग्न राहाल. फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल.
कुंभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल.
मीन: अचानक धन लाभ होण्याची शक्यता. खर्चात वाढ होईल. इस्टेटीतून फायदा होईल. श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा.
क्लिक करा