Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: धनलाभ होईल, उत्पन्नात वाढ होईल; पगारवाढ, पदोन्नती

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. लहान -सहान गोष्टींनी मनास ठेच लागून मन दुःखी होईल.
वृषभ: चिंता दूर होऊन उत्साहात वाढ. मन आनंदी. कल्पनाशक्ती विकसित होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.
मिथुन: थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. उत्पन्नात वाढ होईल.
कर्क: भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेटवस्तू मिळतील. धनलाभ होईल.
सिंह: जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद-विवादामुळे भांडण होईल.
कन्या: नाना प्रकारचे लाभ. उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभेल.
तूळ: घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगारवाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल.
वृश्चिक: प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. अडचणी येतील.
धनु: अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
मकर: विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. व्यवसाय वाढ होईल.
कुंभ: केलेल्या कामात यश, कीर्ती, सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. लाभ होईल. विरोधक, प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
मीन: हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील.
क्लिक करा