Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२४: तुमची रास कोणती? कसा असेल आजचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख-समाधान मिळेल.
वृषभ: आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा-गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल.
मिथुन: आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. चर्चा किंवा वाद-विवादात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. पैसा खर्च होईल.
सिंह: शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल.
कन्या: कौटुंबिक सुख-शांती व दिवस आनंदात जाईल. मिष्टान्नासह आवडीचे भोजन मिळेल. आयात-निर्यात व्यापारात चांगले यश.
तूळ: रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. कामे सफल बनतील. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक: पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजनास खर्च होईल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
धनु: आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून सुख संतोष अनुभवाल. मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल.
मकर: व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढ. व्यापारात फायदा संभवतो. वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकारकडून फायदा.
कुंभ: काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.
मीन: अवैध कामापासून दूर राहा. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा. मानसिक बेचैनी जाणवेल. योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.
क्लिक करा