Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य: तुमची रास कोणती? कसा असेल प्रभाव? पाहा
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ: शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देऊ शकाल.
मिथुन: कामात सफलता मिळेल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
कर्क: शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
सिंह: मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल.
कन्या: विविध लाभाचा दिवस. वरिष्ठ खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल.
तूळ: कामे सहजतेने पूर्ण होतील. मान-सन्मानात वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. मिळकतीत वाढ होईल.
वृश्चिक: आळस, थकवा, चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. संततीची चिंता वाटेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
धनु: नवीन कामाची सुरुवात करू नये. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. खर्चात वाढ होईल. वाणी व वर्तणूक ह्यावर संयम ठेवावा.
मकर: कामाचा व्याप, मानसिक ताणातून सुटका होऊन दिवस आनंदात व्यतीत कराल. आर्थिक लाभ व मान-सन्मान वृद्धी होईल.
कुंभ: कामात यश मिळेल. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी-व्यवसायात सहकारी सहकार्य करतील.
मीन: कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीस दिवस अनुकूल. स्वभावात हळवेपणा राहील. एखादी अनामिक भीती निर्माण होईल.
क्लिक करा