Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२४: यशकीर्तीचा लाभ, भागीदारीतून फायदा
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. घरात सुखद प्रसंग घडतील. सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती लाभ होईल.
वृषभ: वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. आपण केलेल्या कामाची प्रशंसा झाल्याने आनंद होईल.
मिथुन: उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. अचानक धन खर्च होईल.
कर्क: आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल.
सिंह: आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. आर्थिक लाभ संभवतात.
कन्या: वाणीच्या प्रभावाने आपणाला मोठे लाभ होतील. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. आर्थिक लाभ होईल.
तूळ: रागावर नियंत्रण ठेवावे. गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ संभवतात.
वृश्चिक: प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
धनु: कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. पदोन्नती होईल. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील.
मकर: परदेशगमनाची अपेक्षा करणार्यांना यशप्राप्ती संभवते. नोकरीत पदोन्नती संभवते. धनलाभ व सामाजिक मान- सन्मान होतील.
कुंभ: दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. आर्थिक लाभ होतील.
मीन: व्यापारी भागीदारीत लाभ होईल. एखाद्या मनोरंजनात्मक ठिकाणी स्नेह्यांसह आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल.
क्लिक करा