Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२४: तुमची रास कोणती? कसा असेल दिवस?

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
मेष: आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. प्रसन्नता लाभेल.
वृषभ: आजचा दिवस आनंददायी आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आनंददायी बातमी मिळून काही लाभ होतील.
मिथुन: शक्यतो वाद-विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.
कर्क: आज भावंडांकडून लाभ होतील. आनंद लाभेल. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल.
सिंह: आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.
कन्या: आजचा दिवस आनंददायी असेल. उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
तूळ: क्रोधावर नियंत्रण ठेवावे. शक्यतो वाद टाळावेत. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
वृश्चिक: आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील.
धनु: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील.
मकर: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
कुंभ: वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहा.
मीन: दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
क्लिक करा