Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ८ जानेवारी २०२५: रूचकर भोजनाचा आस्वाद, कीर्तीलाभ दिवस

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: प्रत्येक काम उत्साह व आवेशाने भरलेले असल्याचा अनुभव येईल. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आनंद वाढेल.
वृषभ: निराशेची भावना मनात पसरेल. उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल.
मिथुन: विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. फायदेशीर बातमी मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल.
कर्क: गृह सजावटीवर विशेष लक्ष द्याल. व्यापारी व नोकरदार लाभाची, बढतीची अपेक्षा करू शकतात. सरकारी, आर्थिक लाभ होईल.
सिंह: दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या: वाणीवर संयम ठेवावा लागेल. नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. हितशत्रूपासून सावध राहा.
तूळ: व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो.
वृश्चिक: अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल.
धनु: रागावर नियंत्रण ठेवावे. साहित्य, लेखन व कला ह्या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल.
मकर: कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील.
कुंभ: मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. विरोधकांवर मात करू शकाल.
मीन: खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे.
क्लिक करा