Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०८ जानेवारी २०२४: तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: दिवस मिश्र फलदायी. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा.
वृषभ: धनलाभ होईल. स्नेह्यांकडून येणारी बातमी खुश करील. भागीदारीत लाभ. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान मिळेल.
मिथुन: अपूर्ण कामे पूर्ण होतील. मनासारखे यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. मतभेदाचे प्रसंग येतील. सावधानता बाळगा.
कर्क: दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. नवे काम सुरू करण्यास दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल.
सिंह: दिवस प्रतिकूलतेचा. घरात वाद होतील. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहा.
कन्या: कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. भावंडाकडून फायदा होईल.
तूळ: कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. आर्थिक लाभ होईल.
वृश्चिक: कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल.
धनु: स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. खर्चात वाढ होईल.
मकर: विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. शेअर बाजारातून फायदा होईल.
कुंभ: दिवस अनुकूलतेचा. प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. आनंदी राहाल. मोठे यश मिळू शकेल. मान-मरातब वाढेल.
मीन: शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संततीविषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल.
क्लिक करा