Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०७ जानेवारी २०२५: हळवेपणा वाढेल, विरोधकांवर मात कराल

जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल?
मेष: कमी वेळात अधिक लाभ अशा योजनेत फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. अचानक धनलाभ संभवतो.
वृषभ: घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. नवीन मैत्री होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल.
मिथुन: दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी. व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो.
कर्क: आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. नशिबाची साथ लाभणार नाही. व्यापारी येणी वसूल होतील.
सिंह: आचार-विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. अचानक धनलाभ होईल.
कन्या: आजचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील.
तूळ: दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल.
वृश्चिक: मानसिक हळवेपणा वाढेल. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
धनु: कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद-विवाद टाळणे हितावह होईल. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे.
मकर: महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल.
कुंभ: वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैचारिक स्थैर्य लाभेल
मीन: घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. नवीन कामे हाती घेण्यास शुभ दिवस.
क्लिक करा