Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०६ जानेवारी २०२५: मान-सन्मानात वाढ; कष्टाचे यथोचित फल

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. शक्यतो आर्थिक देवाण-घेवाण करू नका. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल.
वृषभ: व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापारविषयक सौदे लाभदायक ठरतील. लाभ होतील व मान-सन्मान मिळेल.
मिथुन: प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. मनास प्रसन्न वाटेल. मान-सन्मान वाढतील. प्रगतीचा मार्ग रुंदावेल.
कर्क: भाग्योदयाची संधी प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. आनंदात भर पडेल. नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता.
सिंह: प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल.
कन्या: नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. बाहेरचे खाणे-पिणे टाळावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
तूळ: व्यापारात लाभ. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य. वेळ आनंदात घालवू शकाल. कामात सफलता व यश प्राप्त होईल.
वृश्चिक: विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने उत्साह अधिकच वाढेल. आर्थिक नियोजनास दिवस अनुकूल. कष्टाचे यथोचित फल मिळेल.
धनु: संवेदनशीलतेमुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता. द्विधा मनःस्थितीने मनात चलबिचल वाढेल.
मकर: दिवस मित्र-परिवारासह आनंदात जाईल. पर्यटन स्थळाला भेट द्याल. व्यवसायिकांना दिवस अनुकूल. आर्थिक लाभ शक्य.
कुंभ: द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात.
मीन: शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. धनप्राप्ती संभवते.
क्लिक करा