Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०५ नोव्हेंबर २०२३: नशिबाची उत्तम साथ; धनलाभाचे योग

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. जपून राहावे.
वृषभ: मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. मित्रांसह प्रवासाचे नियोजन. प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. सन्मान मिळेल.
मिथुन: आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. उत्पन्नात वाढ शक्य.
कर्क: भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन, बाहेर फिरायला जायचे बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. धनलाभ होईल.
सिंह: चुकीच्या वाद-विवादामुळे भांडण होईल. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक.
कन्या: नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस. व्यापार-व्यवसायाच्या विकासासह उत्पन्न वाढेल. सुख-शांती लाभेल. चांगल्या बातम्या मिळतील.
तूळ: घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता. लाभ होईल.
वृश्चिक: प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा.
धनु: वाणी व संताप यावर आवर घालावा. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.
मकर: शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी उत्पन्नात वाढ करतील.
कुंभ: यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. लाभ होईल.
मीन: साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील.
क्लिक करा