Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०५ जानेवारी २०२४: पत-प्रतिष्ठा वाढ; यश-प्रगतीची संधी

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ: दिवस मध्यम फलदायी. अचानक खर्च करावा लागेल. कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
मिथुन: दिवस प्रतिकूलतेचा. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. मित्रांचा सहवास घडल्याने आपणास आनंद होईल.
कर्क: दिवस मध्यम फलदायी. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल.
सिंह: कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. आप्तेष्टांकडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल.
कन्या: प्रभावी वक्तृत्वाने प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक लाभ संभवतो.
तूळ: दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. वक्तृत्वाने इतरांची मने जिंकाल.
वृश्चिक: दिवस मध्यम फलदायी आहे. अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतील. कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. आनंद लुटू शकाल.
धनु: व्यापार-व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. प्राप्तीत वृद्धी.
मकर: दिवस शुभ फलदायी. एखादी चांगली बातमी मिळेल. आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. व्यापारात फायदा होईल.
कुंभ: रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर दिवस आनंदात घालवू शकाल. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल.
मीन: दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. खर्च वाढतील.
क्लिक करा