Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०३ नोव्हेंबर २०२३: धनलाभाचे योग, उत्पन्नात वाढ होईल

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...
मेष: नोकरी-व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता. भावंडांशी सलोखा राहील.
वृषभ: नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल.
मिथुन: आजचा दिवस उत्साह, स्फूर्तीदायक आहे. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कर्क: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. द्विधा मनःस्थिती राहील. गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे.
सिंह: दिवस लाभदायक ठरेल. घरात मंगल कार्ये ठरतील. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल.
कन्या: आखलेल्या योजना साकार होतील. व्यापारी, नोकरदार पुढे जातील. धन, मान - सन्मान वाढेल. सरकारकडून लाभ.
तूळ: नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील. चांगल्या बातम्या मिळतील.
वृश्चिक: उक्ती व कृती यांवर संयम ठेवावा लागेल. खाणे-पिणे सांभाळा. अचानक धनलाभ. अभ्यासासाठी दिवस चांगला.
धनु: मनोरंजन विश्वात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान, प्रसिद्धी मिळेल. भागीदारीत लाभ.
मकर: व्यापार-व्यवसायात वाढ होईल. आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस. कुटुंबात सुख शांती नांदेल. चांगली बातमी समजेल.
कुंभ: अपचन, पोटाचे दुखणेचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल शक्य. मानसिक अस्थिरता जाणवेल. नव्या कामाची सुरुवात नको.
मीन: कुटुंबियांशी वाद-विवाद होतील. नको त्या घटनामुळे उत्साह कमी होईल. धन व कीर्ती हानी होईल. चिंता वाढेल.
क्लिक करा