Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, ३ जून २०२४: सुख-शांततेचा दिवस, आर्थिक लाभ; कामे होतील
तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल?
मेष: आजच्या दिवसाची सुरुवात स्फूर्तीने व उत्साहाने कराल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन कामे सुरू करू शकाल.
वृषभ: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. गैरसमज होण्याची शक्यता आहे. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल.
मिथुन: सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदा. दिवस आनंददायी.
कर्क: व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. सरकारी लाभ. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल.
सिंह: स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल.
कन्या: एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल.
तूळ: दिवस मनोरंजन व मौज-मस्ती करण्याचा. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढ. उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल.
वृश्चिक: निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. अपूर्ण कामे तडीस जातील.
धनु: संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. कामातील अपयशाने निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. मानहानी होण्याचा संभव आहे.
कुंभ: मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्यपूर्वक उत्तम यश मिळवाल.
मीन: आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल.
क्लिक करा