Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, ०३ जानेवारी २०२५: मन प्रसन्न राहील, नोकरीत बढती योग
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल.
वृषभ: आजचा दिवस मिश्र फलदायी. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. नोकरीत बढती संभवते. मन प्रसन्न राहील.
मिथुन: आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अचानकपणे खर्च वाढतील. मन बेचैन होईल.
कर्क: आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ झाल्याने आनंदित व्हाल. आर्थिक बाजू मजबूत होईल.
सिंह: आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. धनवृद्धी संभवते.
कन्या: आजचा दिवस सौख्यदायी. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम. आर्थिक बाबी मार्गी लागतील.
तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील.
वृश्चिक: संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे.
धनु: आज आप्तांशी मतभेद संभवतात. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रूंवर मात करू शकाल.
मकर: आज कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार-व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील.
कुंभ: आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. पदोन्नतीची शक्यता आहे.
मीन: आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी उत्तम फलदायी. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. सरकारी हस्तक्षेप वाढेल.
क्लिक करा