Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२३: आनंदाची बातमी मिळेल; फायदेशीर दिवस

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: प्रवासाचे बेत ठरतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भेटवस्तू मिळतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.
वृषभ: धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायानिमित्त सतत फिरणे होईल.
मिथुन: तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. मुलांशी संवाद ठेवा.
कर्क: नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक. कागदपत्रे सांभाळा. मनात काळजीचे विचार. आर्थिक बाजू बळकट.
सिंह: धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारचे लाभ. सर्वतोपरी सहकार्य मिळेल. मनात आनंदी विचार राहतील.
कन्या: सतत व्यस्त राहाल. वसुलीच्या कामात काही अडचणी असतील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील.
तूळ: मनात आनंदी विचार राहतील. विरोधकांची तोंडे बंद होतील. भाग्याची चांगली साथ राहील. समाजात मान वाढेल.
वृश्चिक: नोकरीत कामाचा ताण कमी राहील. एखादे लचांड मागे लावून घेऊ नका. अचानक धनलाभ होईल.
धनु: कामातील अडचणी दूर होतील. लोकांच्या सहवासात मन रमेल. कागदोपत्री पूर्तता करण्यात दिरंगाई करू नका.
मकर: कामे मार्गी लागतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. किरकोळ वाद टाळा.
कुंभ: तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. काही लोकांना तुमचा द्वेष वाटेल.
मीन: नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.
क्लिक करा