Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाणीत राहावे लागेल सावध!
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल.
वृषभ: आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल.
मिथुन: व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल.
कर्क: आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल.
सिंह: आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील.
कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील.
तूळ: आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील.
वृश्चिक: आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे.
धनु: आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका.
मकर: आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा.
कुंभ: आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे.
मीन: आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
क्लिक करा