Tap to Read ➤

११ टन सोने, १८ हजार कोटींची रोख अन्...; तिरुपती बालाजीची संपत्ती किती?

तिरुपती बालाजी मंदिरात भाविक आणि दानाचा ओघ कायम सुरुच असतो.
जगभरातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांच्या यादीत तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचा क्रमांक लागतो.
तिरुपती मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे. सामान्यांना दर्शनासाठी 30 ते 40 तास लागत असल्याचे बोलले जाते. दरवर्षी 2.5 कोटींहून अधिक भाविक तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
तिरुपतीमध्येच टीटीडी म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यालय आहे. येथे 16 हजार कर्मचारी काम करतात. तिरुपती देवस्थानाला भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे.
काही माध्यमांतील वृत्तांनुसार, गेल्या 12 वर्षात ट्रस्टने केलेल्या मुदत ठेवींच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक 1161 कोटी रुपये जमा केले आहेत. यापूर्वी, केवळ तीनवेळा या मंदिरातील जमा 500 कोटी रुपयांपेक्षा कमी होती.
तिरुमला तिरुपती देवस्थानने गेल्या 12 वर्षांत वर्षानुवर्षे 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करून वेगाने वाढत आहे. 2012 पर्यंत TTD च्या मुदत ठेवी 4820 कोटी रुपये होत्या. त्याच वेळी, तिरुपती ट्रस्टने 2013 ते 2024 दरम्यान 8467 कोटी रुपये जमा केले.
2013 मध्ये 608 कोटी, 2014 मध्ये 970 कोटी, 2015 मध्ये 961 कोटी, 2016 मध्ये 1153 कोटी, 2016 मध्ये 774 कोटी, 2017 मध्ये रुपये आहेत.
2018 मध्ये 501 कोटी, 2019 मध्ये 285 कोटी, 2020 मध्ये 753 कोटी, 2021 मध्ये 270 कोटी, 2022 मध्ये 274 कोटी, 2023 मध्ये 757 कोटी आणि 2024 मध्ये 1161 कोटी रुपये झाले आहेत.
यावर्षी 1161 कोटी रुपयांची FD करून, तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने 2017 मध्ये केलेल्या 1153 कोटी रुपयांच्या सर्वाधिक मुदत ठेवींना मागे टाकले आहे. बँकांमध्ये जमा केलेली एकूण एफडी 13 हजार 287 कोटींवर पोहोचली आहे.
श्री व्यंकटेश्वर नित्य अन्नप्रसादम ट्रस्ट, श्री वेंकटेश्वर ट्रस्ट इत्यादींसह मंदिर ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक ट्रस्टना भक्तांकडून भरीव देणग्या मिळत आहेत. त्यांच्याकडे जवळपास 5529 कोटी रुपयांची मुदत ठेव आहे.
एप्रिल 2024 पर्यंत, तिरुपती ट्रस्टची बँका आणि त्याच्या विविध ट्रस्टमधील रोकड 18 हजार 817 कोटींवर पोहोचली आहे, जी TTD च्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
तिरुपती ट्रस्टला त्याच्या FD वर व्याज म्हणून 1600 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळते. दुसरीकडे, तिरुपती ट्रस्टने नुकतेच 1031 किलो सोने जमा केल्यानंतर आता तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे 11329 किलो सोनेही बँकांमध्ये जमा झाले आहे.
या मंदिरात भाविकांकडून रोख-सोन्याचे दान सातत्याने वाढत आहे. तिरुपतीला दान देण्याच्या प्रथेच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळतात.
तिरुमला तिरुपती देवस्थानाने २०२३-२४ या वर्षासाठीचा ४,४११.६८ कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला होता.
तिरुपती बालाजी मंदिरात भगवान वेंकटेश्वराची पूजा केली जाते, त्यांना श्रीविष्णूंचे एक रूप मानले जाते. तिरुपती बालाजी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची आणि दान देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे सांगितले जात आहे.
क्लिक करा