काळी झालेली ऑक्सिडाइज ज्वेलरीची ‘अशा’ पद्धतीने करा स्वच्छ

बऱ्याचदा ही ज्वेलरी ठराविक वेळेनंतर काळी पडायला लागते. 

सध्या मार्केटमध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरीला विशेष पसंती आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये स्त्रिया सहज ऑक्सिडाइज ज्वेलरी वापरतात.

नवरात्रीच्या दिवसात तर स्त्रिया हमखास ऑक्सिडाइज ज्वेलरीला पसंती देतात.

बऱ्याचदा ही ज्वेलरी ठराविक वेळेनंतर काळी पडायला लागते. ज्यामुळे तिचा शो निघून जातो. म्हणूनच, ऑक्सिडाइज ज्वेलरी काळी पडल्यानंतर ती स्वच्छ करण्याचे काही उपाय पाहुयात.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा टाका आणि त्यात हे दागिने बुडवून ठेवा. ज्यामुळे ते स्वच्छ होतील.

ऑक्सिडाइज ज्वेलरीला व्हिनेगर लावून ब्रशने हलक्या हाताने घासा. त्यानंतर १५ मिनिटे त्यावर व्हिनेगर तसंच ठेवा. यामुळेही हे दागिने स्वच्छ होतात.

ऑक्सिडाइज ज्वेलरीला कधीही परफ्यूम लावू नका. त्यामुळे ती काळी पडते.

मुलांमधील संभाषण कौशल्य कसे सुधारावे? 

Click Here